आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला बर्‍याच वेळेस खांदेदुखीचा त्रास(shoulder pain) सहन करावा लागतो.खांदेदुखी किंवा Rotator cuff injury होण्याचे मुख्य कारण काळानुरूप खांद्याच्या स्नायु मध्ये होणारी झीज  आणि स्नायु तुटणे हे आहेत. बर्‍याच वेळेस जास्त वजन उचलल्यामुळे, हात जास्त वेळेस डोक्याच्यावर उचलून धरल्यामुळे खांद्यांच्या स्नायूंना इजा होऊ शकते किंवा एखाद्या अपघाताने वा पडल्याने सुद्धा असे होऊ शकते.प्रोलोथेरपी उपचारांसह विना ऑपरेशन खांद्याच्या दुखण्यापासून मुक्तता(Relief from Rotator cuff Injury).

Rotator cuff म्हणजेच स्नायु आणि tendons चा समूह असतो जे आपल्या खांद्याला स्थिरता देते. प्रत्येक हालचालीत जेव्हा खांद्याचा वापर केला जातो तेव्हा हे रोटेटर कफ त्या हालचालीत खांद्याच्या जोडाला स्थैर्य देण्याचे काम करते. या स्नायुंवर जेव्हा ताण येतो, ते ओढले जातात किंवा तुटतात तेव्हा खांदेदुखीचा त्रास सुरु होतो.

खांदेदुखीची कारणे (Causes of shoulder pain) 

  • जास्त प्रमाणात खांद्याची हालचाल केल्यावर 
  • काळानुरूप स्नायुक्षय (Atrophy over time) होणे किंवा तुटणे 
  • अपघातमुळे झालेली दुखापत 

खांदेदुखीचे प्रमाण कमी किंवा जास्त असू शकते या प्रमाणे Tendinitis (तीव्र) किंवा Tendeninopathy (दीर्घकालिक) असे दोन प्रकार असतात।  खांद्याचे जे स्नायु (tendons) मांसपेशी आणि हाडांना जोडतात ते जास्त प्रमाणात ताण पडल्यामुळे आंशिक किंवा पूर्णपणे तुटू शकतात.

सर्वसाधारण पणे टेनिस, बैडमिंटन खेळाडू  पेंटिंग करणारे जे आपले हात उंचावून काम करतात अशा लोकांना याचा त्रास जास्त जाणवतो.

खांदेदुखीची लक्षणे (Symptoms of shoulder pain)

सर्व प्रकार च्या खांदेदुखीत लगेच खूप वेदना होतातच असे नाही.कधी कधी वेग-वेगळ्या परिस्थिती आणि शारीरिक हालचाली मुळे खांदेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो आणि वेदना सुरु व्हायच्या कित्येक महिने किंवा वर्ष आधीच त्याची लक्षणं दिसू शकतात.  

खांदेदुखीत (Rotator cuff injury) खालील लक्षण दिसू शकतात–

  • हात डोक्याच्या वर नेल्यास दुखणे 
  • मागच्या बाजूला पाठीकडे हात केल्यावर दुखणे 
  • दुसर्‍या बाजूला हात नेल्यास त्रास होणे 
  • खांदे अशक्त होत जाणे 
  • रात्री खांदे दुखणे
  • दुखत असलेल्या खांद्यावर झोपताना त्रास होणे

खांदेदुखीवर उपचार (Treatment of shoulder pain)

खांदेदुखी चे उपचार करताना दुखापत झालेल्या खांद्याला आराम देण्यापासून ते थेट ऑपरेशन पर्यंत अनेक उपाय केले जातात.परंतु,  शस्त्रक्रियेशिवाय तीव्र आणि जुनाट दोन्ही खांद्याचे दुखणे प्रभावीपणे दूर होते. त्याला प्रोलोथेरपी उपचार म्हणतात. प्रोलोथेरपी ही एक प्रकारची थेरपी आहे जी पाठीच्या बाजूने वेगवेगळ्या ठिकाणी वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. ही एक इंजेक्शन किंवा सुई आधारित थेरपी आहे. यामध्ये सुईच्या सहाय्याने रुग्णाच्या शरीरात विशिष्ट प्रमाणात इंजेक्शन टोचले जाते.रुग्णाला प्रोलोथेरपी इंजेक्शन मिळाल्यानंतर, प्रभावित भागात सामान्यतः काही दिवस सूज आणि वेदना होतात. बरे होण्याची प्रक्रिया होण्यासाठी डॉक्टर पुढील प्रक्रियेचे वेळापत्रक देतात. काही आठवड्यानंतर पुन्हा इंजेक्शन असतात. रुग्णाला इंजेक्शन ची जागा स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याची सूचना दिली जाते. त्यामुळे कुठलाही संसर्ग होत नाही.

खांदेदुखीवर उपचारासाठी (treatment of shoulder pain) ऑपरेशन करण्यापेक्षा प्रोलोथेरपी (Prolotherapy) जास्त सोपी असून दीर्घकालिक खांदेदुखीवर प्रभावी आणि समाधानकारी आहे. विना ऑपरेशन खांद्याच्या दुखण्यापासून मुक्तता आणि उपचारासाठी आमच्याशी संपर्क साधा  डॉ. विक्रम राजगुरू त्यांच्या द प्रोलोथेरपी क्लिनिकमध्ये(The Prolotherapy Clinic)

प्रोलोथेरपी (Prolotherapy) ही एक थेरपी आहे जी मानवी शरीरातील विविध ठिकाणी होणार्या वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. प्रोलोथेरपी (Prolotherapy) ही थेरपी तीव्र वेदनांवर(On acute pain) एक रामबाण उपाय मानली जाते. हा एक सुरक्षित उपचार आहे जो इंजेक्शनद्वारे दिला जातो. कोणतीही शस्त्रक्रिया न करता ही एक कायमस्वरूपी वेदना मुक्त, सुरक्षित थेरपी आहे.

डॉ. विक्रम राजगुरू हे भारतातील पहिल्या इंटरव्हेंशनल रीजनरेटिव्ह ऑर्थोपेडिक आणि ऑर्थो बायोलोजिक सर्जन पैकी एक आहेत. HHPF (Affiliated to Wisconsin University, Madison, (USA) जी प्रोलोथेरपीची संस्थापक संस्था आहे. तिथून प्रोलोथेरपीचे प्रशिक्षण घेणारे ते पहिले भारतीय आहेत. आपल्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच रुग्णांना वेदना निवारण देऊन आणि नॉन सर्जिकल तसेच सर्जिकल उपचारांद्वारे गमावलेली गतिशीलता पुन्हा मिळवून सक्रिय जीवनशैली मिळविण्यास मदत केली आहे.